ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

कोरोनाचा रेकॉर्डब्रेक उच्चांक; दिवसभरात वाढले तब्बल ‘एवढे’रुग्ण

0

अहमदनगर Live24 टीम ,4जुलै 2020 : देशात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. संक्रमणाचे प्रमाण कमी होण्याचे चिन्ह दिसून येत नाहीत. गुरुवारी प्रथमच कोरोनाने रुग्णवाढीचा उच्चांक केला.

तब्बल २० हजार ९०३ रुग्ण नव्याने आढळून आल्याने आता चिंता वाढली असून देशात एकूण बाधितांचा आकडा ६ लाख २५ हजार ५४४ झाला आहे.

Advertisement

या २४ तासांत महाराष्ट्रात ६ हजार ३२८, तामिळनाडूमध्ये ४ हजार ३४३, दिल्लीमध्ये २ हजार ३७३, कर्नाटकात १ हजार ५०२ तर तेलंगणामध्ये १ हजार २१३ जणांना बाधा झाली आहे.

या राज्यांमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १ लाख ८६ हजार ६२६ एवढी झाली आहे.

Advertisement

यात दिलासादायक बाब म्हणजे देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. ते प्रमाण जवळपास ६०.७३ टक्के झाले आहे. आतापर्यंत ३ लाख ७७ हजार ८९१ रुग्ण बरे झाले आहेत तर २ लाख २७ हजार ४३९ जणांवर उपचार सुरू आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Advertisement

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li