ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

तालुक्यासह गावभर फिरला होता तो कोरोनाबाधित, प्रशासनापुढे मोठे आव्हान …

0

अहमदनगर Live24 टीम ,4जुलै 2020 :  कोरोनाबाधित शासकीय ठेकेदार व ग्रामसेवकाने पंचायत समिती कार्यालयासह शहराच्या विविध भागात संचार केल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे व नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी शुक्रवारी दिले.

तिखोल येथील रहिवासी असलेल्या ठेकेदाराने सध्या ढवळपुरी येथे विविध कामांचा ठेका घेतला असून कोराेनाची लक्षणे आढळल्याने तो स्वतः पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. तेथे उपचार घेऊन कोरोना अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच तो तालुक्यात परतला.

Advertisement

पारनेर शहर, टाकळी ढाेकेश्वर, तिखोल, तसेच ढवळपुरी येथील अनेकांच्या तो संपर्कात आला.तालुक्यात परतल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ठेकेदारास नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आता हा ठेकेदार पारनेर, तिखोल, टाकळी ढाकेश्वर, ढवळपुरी, तसेच पुण्यात ज्यांच्या संपर्कात आला, त्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.

Advertisement

पारनेर पंचायत समितीतील ग्रामसेवकास त्रास होऊ लागल्यामुळे तो स्वतः नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

पारनेर शहरात त्यांचा संचार झालेला आहे. त्यामुळे तहसीलदार देवरे व मुख्याधिकारी डॉ. कुमावत यांनी खबरदारीचा उपाय म्हणून पारनेरमधील व्यवहार दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.पंचायत समितीमधील सर्व कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आले असून दोन दिवस कार्यालय बंद ठेवण्यात येणार आहे.

Advertisement

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li