ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर जिल्ह्यातील ते कोरोनाबाधित आमदार ‘इथे’ घेणार उपचार !

0

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :   कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात 34 जणांना संसर्ग झाला आहे. कोरोना विषाणूने अहमदनगर जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधींला गाठले. 

नगर उत्तरमधील एका मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे हे लोकप्रतिनिधी सावेडीचे रहिवाशी आहेत. संसर्ग झालेले लोकप्रतिनिधी साहित्यप्रेमी आहेत.

Advertisement

विशेष म्हणजे या लोकप्रतिनिधीने एका सरकारी कार्यालयात नुकतीच बैठक देखील घेतली होती. विद्यमान सरकारमधील असलेल्या या लोकप्रतिनिधीभोंवती कामे करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा देखील गर्दी असते.

त्यामुळे लोकप्रतिनिधीच्या संपर्कात असलेल्या कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. या लोकप्रतिनिधीच्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांच्या शोधासाठी स्थानिक प्रशासकीय यंत्रणा चांगलीच ढवळून निघाली आहे..

Advertisement

दरम्यान, आमदार हे त्यांच्या नगर येथील निवासस्थानी होम क्वारंटाईन झाले होते. काल त्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव आला असून ते मुंबई येथे उपचार घेणार असल्याचे त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Advertisement

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li