ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : मोठ्या कापड दुकानाच्या मालकाचा कोरोनाने घेतला बळी !

0

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :   नगर शहरातील एमजीरोड येथील एका मोठ्या कापड दुकानाच्या मालकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे कापड बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये एकच घबराट पसरली आहे.

अहमदनगर शहरातील एका मोठ्या दुकानाच्या मालकाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.  या प्रतिष्ठित व्यापाऱ्याचा दोन दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

Advertisement

मृत व्यक्ती ही व्यावसायिक असून त्यांचा कापड आणि वाईनचा मोठा व्यावसाय आहे. ही व्यक्ती चार ते पाच दिवसांपासून खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती.

सर्दी, ताप, खोकल्याचा त्रासानंतर या व्यक्तीला निमोनियाचे निदान झाले होते. त्यानंतर खाजगी प्रयोगशाळेतच कोविड चाचणी करण्यात आली होती. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

Advertisement

कापडबाजार या व्यक्तीचे मोठे दालन आहे. परंतु हा परिसर गेल्या काही दिवसांपासून बफर झोनमध्ये आहे.नगर शहरातील कोरोनाबाधिताचा हा पहिला मृत्यू आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Advertisement

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li