ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : पाथर्डी तालुक्यात गोळीबार ! पंचायत समितीच्या माजी सभापती…….

0

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  पाथर्डी तालुक्यातील शिराळ (चिचोंडी ) येथे रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शेतीच्या वादातून दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत एका गटाकडून थेट गोळीबार करण्यात आल्याने एका तरुणाच्या पायाला गोळी लागली.

तसेच या हाणामारीत  एकमेकांवर तुफान दगडफेकही करण्यात आल्याने सुमारे 15 ते 20 जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पंचायत समितीच्या माजी सभापतीचा देखील समावेश आहे.

Advertisement

याबाबत  माहिती अशी की शिराळ येथील अमोल श्रीधर वाघ व सचिन बाळासाहेब वाघ यांच्यात शेतातील पाईपलाईनचे फिल्टर मोडल्याच्या कारणावरून दोन दिवसापूर्वी किरकोळ वाद झाला होता.

त्यानंतर रविवारी दुपारी या वादाचे मोठया हाणामारी रूपांतर झाल्याने या हाणामारीच्या वेळी गोळीबार देखील झाला असून सुरुवातीला हवेत गोळीबार केल्यानंतर दुसरी गोळी अमोल वाघ यांच्या पायाला लागल्याचे समजले आहे.

Advertisement

या हाणामारीत  तलवारी, काट्या तसेच मिरची पुढचा देखील वापर करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांच्या घटनास्थळाच्या पाहणी केल्यानंतर लक्षात आले.

हाणामारी दरम्यान चार चारचाकी गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आल्याचे समजले असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याने दोन्ही बाजूची मिळून सुमारे 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत.

Advertisement

या हाणामारीमध्ये काही महिलांना देखील जबर मारहाण करण्यात आली असुन एका महिलेचा हात फॅक्चर झाला आहे . या मारहाणी प्रकरणात पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापतीचा देखील समावेश असल्याची माहिती समजली असून

घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक अखीलेश कुमार सिंह ,उपाधिक्षक सागर पाटील, उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

Advertisement

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li