ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे कांदा चाळीचे अनुदान जमा

0

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : मागील दीड वर्षांपासून रखडलेल्या कांदाचाळींचे अनुदान कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे.

राज्य शासनाच्या ‘राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत’ कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदाचाळीची उभारणी केली होती.

Advertisement

मात्र, दीड वर्षांपापासून कांदा चाळींच्या अनुदानाचे भिजत घोंगडे तसेच पडले होते. अनुदान मिळण्यास विलंब झाल्याने मतदारसंघातील शेतकऱ्यांनी आपल्या अडचणींचा पाढा आ.रोहित पवारांपुढे वाचला.

शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आमदार पवारांनी कांदाचाळीच्या रखडलेल्या अनुदानासंदर्भात कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा केला,

Advertisement

कृषी आयुक्त सुहास दिवसे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप,कर्जतचे कृषी अधिकारी दिपक सुपेकर, जामखेडचे कृषी अधिकारी सुधीर शिंदे आदींच्या प्रयत्नातून ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली.

यात अनुदान रखडलेल्या शेतकऱ्यांपैकी ८३ शेतकऱ्यांचे ८७,५०० रु.प्रमाणे ७२ लाख ६२ हजार ५०० रु. अनुदान मंजुर करुन आणले असुन अनुदानाची ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमाही करण्यात आली आहे.

Advertisement

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li