साेयाबिन बियाण्याची उगवण न झाल्याने ‘त्या’ कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :सोयाबीन या पिकाचे के एस एल 441 या नावाचे निकृष्ट बियाणे शेतकर्‍यांना विक्री करून त्यांची फसवणूक केली म्हणून तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी दिलेल्या

फियादीनुसार कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या (जालना) व्यवस्थापकावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडू नानाभाऊ अंभोरे असे आरोपीचे नाव आहे.

खरीप हंगामात बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या जिल्ह्यात अवतरतात आणि शेतकऱ्यांना आपली बियाणे चांगली असून अधिक उगवण शक्ती असल्याच्या थापा मारतात, यात शेतकरी बळी पडतो.

कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड जालनाचे व्यवस्थापक दगडू नानाभाऊ अंभोरे व यांनी ५ जून ते २० जून या कालावधीत संवत्सर, कान्हेगाव, ओगदी व इतर गावच्या शिवारात कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड,

जालना या कंपनीचे केएसएल ४४१ सोयाबीन बियाणे आणून आमच्या कंपनीचे सोयाबीन उगवण क्षमता जास्त असल्याचे दाखवून निकृष्ट दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले.

इकडे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात अंकुर सोयाबीनचे सिड्सची पेरणी करून देखील बियाणे १० ते २० टक्के उतरले. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठून आपली कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड,

जालना कंपनीने फसवणूक केल्याची कैफियत मांडली. त्यानंतर तालुका अधिकारी अशोक आढाव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या पेरलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. त्यानंतर आढाव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment