Ahmednagar NewsAhmednagar NorthCorona Virus Marathi News

ब्राह्मणवाडा येथील आणखी दोघे बाधित; एकूण रुग्ण संख्या चारवर

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर शहरासह जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाचा प्रसार वाढत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात ठेवून नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करणे आवश्‍यक असताना नागरिक बेपर्वाईने वागत असल्याचे दिसत आहे.

आता याचे लोन ग्रामीण भागातही पसरत चालले आहे. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील कोरोना बाधितांच्या संख्येत आज ‘दोन’ने वाढ झाली आहे.

बुधवारी दोन कोरोना बाधित आढळल्यानंतर आज शनिवारी पुन्हा दोन युवकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता ब्राह्मणवाडा येथील बधितांची संख्या चार झाली आहे.

तालुक्यातील रुग्णांची संख्या आता २९ वर पोहोचली. बुधवारी ब्राह्मणवाडा येथे मुंबईहून आलेल्या दोन व्यक्ती संशयास्पद कोरोना बाधित अाढळल्यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात

आल्यानंतर त्यांचा तपासणी अहवाल कोरोना पॅाझिटिव्ह आला. आता पुन्हा या दोन कोरोना बाधित पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संंपर्कातील आणखी दोन व्यक्तींचा कोरोना अहवाल शनिवारी पाॅझिटिव्ह आला आहे. याशिवाय ब्राह्मणवाडा येथील अजूनही काही संपर्कातील संशयास्पद लोकांचे अहवाल येणे बाकी आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button