त्या माणसावर गुन्हा दाखल केला तर महाराष्ट्रातला शंभर टक्के तरूण पेटून उठेल.

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : देव धर्माच्या माध्यमातून समाजप्रबोधन करून समाजप्रबोधन सह सुधारवणे हा गुन्हा होत असेल तर प्रत्येक महाराज, व्याख्याता, प्रबोधनकार यांच्यावर सुध्दा गुन्हा दाखल करावा लागेल.

इंदोरीकर महाराज गेल्या 25 वर्षांपासुन व्यसनमुक्ती, स्री भृणहत्या, पर्यावरणाचे संरक्षण, आई वडीलांची सेवा यावरती ग्रंथातील पुरावे देऊन प्रबोधन करत आहे. इंदोरीकर महाराज यांनी कुठलाही गुन्हा केला नाही.

Advertisement

गुरूचरित्रासह इतर धार्मिक ग्रंथामध्ये त्यांनी केलेल्या व्यक्तव्याचे संदर्भ असुन अनिसच्या कार्यकर्त्यांनी सवंग लोकप्रियतेसाठी खटाटोप केला असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

माझ्या सारखे किती तरी तरूण महाराजांच्या किर्तनामुळे स्वत:च्या पायावर उभे आहेत. मी तर म्हणतो तरूणात परिवर्तन घडवणारे फक्त इंदोरीकर महाराज आहेत आणि जर तुम्ही त्या माणसावर गुन्हा दाखल केला त

Advertisement

र महाराष्ट्रातला शंभर टक्के तरूण पेटून उठेल. आंदोलन, मोर्चे होतील. म्हणून तुम्ही त्यांच्यावर खोटे आरोप करू नका आणि आम्ही ते सहन करणार नाही, असे प्रतिपादन ह.भ.प. चंद्रकांत महाराज खळेकर खडांबेकर यांनी केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

Advertisement

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement