Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : २५ वर्षीय तरुणाचा खून, आरोपींना अटक

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : कोपरगाव शहरातील रेणुकानगर येथील ख्रिश्चन मिशनरी शाळेच्या सुरू असलेल्या बांधकामावर किरकोळ वादातून २५ वर्षीय परप्रांतीय मजुर तरुणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. 

सानू निमाई बिस्वास ( वय २५ वर्षं, रा. सरुलीया, मंगलकोट, बर्धमान, पश्चीम बंगाल ) असे मृत मजुराचे नाव आहे. काल (सोमवार) रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी राहुल राजव्यापारी मोंडल ( रा. माजेग्राम, राणाघाट, नदिया, पश्चिम बंगाल ) व सुकल मंगला हेमब्राम ( रा. छोरा कॉलनी, छोरा हटला, छोरा बर्धमान, बमन बाग्राम, पश्चीम बंगाल ) यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

आपापसात किरकोळ शिवीगाळ करून मारहाण करण्यापर्यंत हा वाद वाढला. व याचा विपर्यास होऊन या मजुराच्या डोक्यात लाकडी दांडा मारून खून करण्यात आला.

या प्रकरणी दिगंबर ज्ञानदेव होगे ( वय ५२, वर्षे, धंदा मजुरी, रा. भारत गॅस एजंन्सी जवळ, शिंगी-शिंदे नगर, कोपरगाव ) यांनी फिर्याद दिली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close