माजी आमदार विजय औटी म्हणाले फोडाफोडीच्या राजकारणावर पक्षाचे नेतेच बोलतील !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : पारनेर नगरपंचायतीची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर पारनेरमध्ये ५ शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने असे केल्याने माजी आमदार विजय औटी हे उद्विग्न झाले असून त्यांनी याबाबत उद्विग्न प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले ‘राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांचे एकत्रित सरकार आहे. शिवसेनेचे नगरसेवक फोडून राष्ट्रवादी काँग्रेसने ते आपल्या पक्षात घेतले.

ही फोडाफोडी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाली आहे. याविषयी शिवसेनेचे नेते अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर हेच प्रतिक्रिया देतील.

‘ अशा शब्दांत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी आपला त्रागा व्यक्त केला. राष्ट्रवादी पक्ष कोणत्या दिशेने चालला आहे, याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते जास्त चांगले बोलू शकतील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

औटी म्हणाले, मी विधानसभा सदस्य असताना माझ्या पाठपुराव्याने नगरपंचायतीची स्थापना झाली. त्यानंतर निवडणूक झाली. या नगरसेवकांना देखील माझ्याकडे पाहून लोकांनी मतदान केले.

मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून विकासकामे देखील केली. मी कुठेही कमी पडलो नाही. नगरसेवक स्वार्थासाठी तिकडे गेले असावेत का, याचा निकाल जनताच लावेल.

मी काही बोलणार नाही. पक्षशिस्त असते, त्यानुसार प्रत्येक पक्षाचे काही संकेत असतात. तसेच शिवसेनेत देखील आहेत. शिवसेना शिस्त पाळणारा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाचे प्रवक्ते व वरिष्ठ नेते या पक्ष प्रवेशाविषयी बोलतील.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment