ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : जिल्हयातील सर्व उद्योजकांना जाहिर आवाहन करण्यात येते की, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर या कार्यालयामार्फत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त दिनांक 13 जुलै ते 15 जुलै 2020 या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

ज्या उद्योजकांना मनुष्यबळाची कमतरता आहे, अशा उद्योजकांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची नोंदणी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर दिनांक 9 जुलै 2020 पर्यंत अधिसूचित करावे व आपला या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवावा,

असे आवाहन या कार्यालयाचे सहायक आयुक्त वि. जा. मुकणे यांनी केले आहे. तसेच याबाबत काही अडचण असल्यास 0241- 2425566 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment