‘ती’ एक चूक पडली महागात ; श्रीरामपुरातील ‘त्या’ कुटुंबातील चौघांना कोरोना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : कोरोना बाधित व्यक्तीचा मृतदेह नगर येथील जिल्हा रुग्णालय प्रशासनाने चक्क श्रीरामपूरला नेऊन कुटुंबियाच्या ताब्यात दिला. ही गंभीर चूक लक्षात येताच जिल्हा रुग्णालयाने कुटुंबीयांना मृतदेह परत नगर येथे पाठवण्यास सांगितले.

मात्र तोपर्यंत श्रीरामपूर येथे अंत्यविधी पार पडला होता. आज आलेल्या रिपोर्टनुसार याच कुटुंबातील चौघांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कुटुंबीयाच्या मागणीनुसार जिल्हा आरोग्य विभागाने सदर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.

कुटुंबियांनी मृतदेह प्रभाग दोन परिसरात आणुन आरोग्य आणि पोलिसांच्या उपस्थित दफनविधी केला. त्यानंतर मृत रुग्ण कोरोनाबाधित असुन मृतदेह तात्काळ नगरला पाठवा असा निरोप नगर येथुन आला.

परंतू तो पर्यंत दफनविधी उरकला होता. दफनविधी केलेल्या कुटुंबातील चौघांचे तपासणी अहवाल आज कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे.

आज आलेल्या अहवालानुसार पारनेर मधील ४५ वर्षीय पुरुष, श्रीरामपूर मधील ३० व २४ वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरुष आणि ७ वर्षीय मुलगा बाधित आढळून आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment