Corona Virus Marathi NewsSpacial

थोडंसं मनातलं : कोरोना” आणि आता ‘निसर्ग वादळ’ देव अजुन किती परीक्षा पहाणार? … ॲड शिवाजी कराळे 

Best Sellers in Electronics

नमस्कार मित्रांनो 
कोरोना नावाचा व्हायरस संपूर्ण देशभर थैमान घालतोय. देशभर अनेक लोक कोरोना संसर्गित असल्याचे समोर आले आहे. तसेच आपला महाराष्ट्र सुद्धा जवळपास दोन लाखाचे आसपास गेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांसाठी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वास्तविक ती संख्या कमी होईल अशी अपेक्षा होती. कोरोना प्रदुर्भाव टाळण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन, महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करतच आहेत. अनेक रूग्ण बरे झाले आहेत व त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. एका अर्थाने ही आनंदाची गोष्ट आहे. 

हे परमेश्वरा किती कसोटी पाहणार आहेस तू जनतेची.  खरं तर देशातील लोक हे विविध संकटाला सामोरे जात आहेत ,असे असताना जवळपास शंभर वर्षांपूर्वी देशांमध्ये प्लेगची साथ आली होती. प्लेगच्या साथीने गावातली लोकसंख्या कमी तर झालीच पण गावाची गावं उद्ध्वस्त झाली होती. त्यानंतर अशीच काहीशी साथ स्वाइन फ्लूच्या बाबतीत आली होती. त्यानंतर स्वाइन फ्लू झाल्यानंतर लोकांना कुठेतरी आधार मिळतोय तोच  सुनामी लाटांचा सारखा प्रकार या जगामध्ये घडत गेला. त्यानंतर या गोष्टीतून लोक  सावरत नाही तोच स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू  ला  लोक सामोरे गेले आहेत. शहरात आता कोरोना घुसलेला आहे. आता कोरोना ला कुठे तरी सामना करत असतानाच ” निसर्ग वादळ ” महाराष्ट्रात घोंघावत आहे. खरंच परमेश्वर अजुन लोकांची कीती परीक्षा पहाणार हे तोच जाणे. आता  नगर शहराची कोरोना ग्रस्तांची संख्या आता जवळजवळ पाचशे च्या आसपास गेलेली आहे. असे असताना नागरिकांनी आपली काळजी घेणे गरजेचे आहे, परंतु नेमके याच्या उलट होताना दिसतेय, की नागरिक बेजबाबदारपणे वागताना दिसताहेत, कधीकधी परमेश्वर खरंच का परीक्षा पाहतोय का असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

आता सध्या 31 जूलै पर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकारने लोक लाॅकडाऊन जाहीर केला आहे. असे असताना गोरगरिबांचे पोट भरावं, हातावरल्या पोटांना काम मिळावं, तसेच कोणीही उपाशी राहू नये म्हणून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने छोटे-मोठे उद्योग सुरू केलेले आहेत. असे असताना लोक कामावर जात आहेत, परंतु कामावर जाताना जो सोशल डिस्टन्स आहे त्याचे पालन करत नाहीत, प्रशासनाचे जे नियम आहेत त्याचं पालन करताना दिसत नाहीत, मग खरं सांगा की जर असं होत असेल तर नेमकं प्रशासन चुकतंय की माणूस चुकतोय हे सांगणे जरा थोडं कठीण आहे.  लोकांनी थोडा विचार केला पाहिजे की,  आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत,आपण व्यवस्थित राहिलो तर सगळे जग सुखी राहील .

केवळ पैसा पैसा आणि पैसा करून चालणार नाही. त्यासाठी आपण आपली काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या घरातील ज्येष्ठ माणसं आहेत त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच या बरोबर सर्व कुटुंबाची गल्लीची नातेवाईकांची काळजी घेणे सुद्धा आपलं गरजेचे आहे. आज कोरोनाच्या मारीला आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि जिल्हा प्रशासन यानी  खूप मोठ्या उपाययोजना केलेल्या आहेत.  एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जनता सुरक्षित राहावी म्हणून अनेक कोरोना योद्धे बळी गेले आहेत. डॉक्टर, पोलीस प्रशासन हे आपल्यासाठी काम करत आहेत. तसेच कधीकधी जर असा विचार केला की लोक बाहेरून आल्यानंतर  आपली तपासणी का करून घेत नाहीत. वास्तविक पाहता त्यांनी त्यांची तपासणी करून घेतली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला कुठेतरी नक्की मदत होईल.

मित्रहो आजूनही वेळ गेली नाही, आपण विनाकारण घराबाहेर पडू नये, जर आपलं खरच काही काम असेल तरच घराबाहेर पडावं. आता नगर शहरांमध्ये कोरोना आत घुसलेला आहे,  याचे फार मोठे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत.  साथीच्या रोगांनी गावची गाव उध्वस्त झालेले आहेत ,स्वाइन फ्लू मध्ये बरेच लोक गेलेले आहेत, बर्ड फ्लू सुद्धा मध्ये काही लोक गेले, सारी नावाच्या आजारात सुद्धा काही लोकं  गेलेले आहेत. तसेच जे  जेष्ठ नागरिक आहेत, त्यांना हार्ट चा प्रॉब्लेम आहे, डायबिटीस आहे किंवा इतर जे काही शारीरिक विकार आहेत या लोकांच्या दृष्टीने करून हा कोरोना खूप घातक आहे याचा विचार करणे गरजेचे आहे.

म्हणून आपण काळजी घेणे गरजेचे आहे ,जर आपण आपली काळजी घेतली नाही तर निश्चितपणे आपला जीव जाईल म्हणजे नक्कीच जाईल.त्यासाठी आपण प्रशासन आणि सरकारने दिलेल्या सूचना यांचे वेळोवेळी आपण पालन केले पाहिजे.  वेगवेगळ्या माध्यमातून अफवा पसरवल्या जातात  त्याचेकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे, खरंतर हे परमेश्वरा किती अंत पाहणार आहेस तु या जनतेचा. कारण आता सगळे धार्मिक स्थळ बंद आहेत आता माणूसच देव म्हणून डॉक्टरच्या रुपात पोलिसांच्या रूपात जनतेला वाचविण्यासाठी प्रयत्न करताहेत. असे असताना खरं तर जनता सुरक्षित राहावी म्हणून खूप व उपाय योजना सरकारने केलेले आहेत परंतु  काही बेजबाबदार नागरिकांनी त्याचा गैरफायदा घेतलेला आहे . गंभीर गुन्हे घडतातच कसे हा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे, तसेच बाहेर  गावावरून तपासणी न करता लोक येतातच कसे हा प्रश्न निर्माण झालेला आहे.

या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आपण निश्चितपणे अजूनही सुरक्षित नाहीत याची खात्री पटते. मित्रहो अजूनही वेळ गेलेली नाही. भय अजून  संपलेलं नाही, कोरोना ही मोठी महामारी आहे आणि याला जर हरवायचं असेल तर आपण सर्वांनी मिळून एका दृष्टीने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे आणि जर आपण असं केलं नाही तर निश्चितपणे एक दिवस या साथीच्या आजारांमध्ये आपला बळी जाईल. या नगर शहरात प्रथम तालुक्यामध्ये काही लोक सापडली होती परंतु आता नगर शहराच्या मध्यवस्तीत मध्ये काही संसर्गजन्य बाधित सापडलेले आहेत. मित्रहो याची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली तर एक दिवस संपूर्ण शहर कोरोना बाधीत झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग आपल्या हातातून वेळ निघून गेलेली असेल.

असं व्हायचं नसेल तर आपण कृपया आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. आपल्या परिसरामध्ये जर नवीन कोणी लोक आलेले असतील तर त्याची माहिती प्रशासनाला द्या तसेच जर कोणी स्वतःहून कोरांटाईन  होणार असेल तर त्यांनी स्वतःहून कोरांटाईन व्हावे. तसेच त्यांची तपासणी करून घ्यावी ,परंतु काही लोक केवळ मोठेपणाचा आव आणून प्रशासना पासून  ही माहिती लपवत आहेत.  असं करू नये, जर असं केलं तर निश्चितपणे त्यांच्यामुळे सर्व लोकांना त्याची लागण होईल आणि मग कोरोना आटोक्यात आणणं शक्य होणार नाही. प्रथम प्लेग, त्सुनामी, स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू, आणि आता कोरोना व निसर्ग वादळ अशी एकामागोमाग संकटे येतच आहेत.  एका अर्थाने परमेश्वर आपली परीक्षा पहातोय असं म्हणायला हरकत नाही.  म्हणून मित्रहो प्रशासनाला सहकार्य करा, घरीच रहा सुरक्षित रहा धन्यवाद.

ॲड शिवाजी अण्णा  कराळे 
सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर 
99 22 545 545

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button