थोरातांच्या मतदारसंघातील ‘या’ गावातील कोरोनाबाधितांचा आकडा ३८, पालकमंत्री आज देणार भेट !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  संगमनेर तालुक्यातील कुरणमध्ये १० दिवसांत कोरोनाबाधितांचा आकडा ३८ वर गेली. मंगळवारी गाव सील करण्यात आले.

दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज गुरुवारी कुरणला भेट देणार आहेत. संगमनेरमध्ये बाधितांची संख्या वाढत असून संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध सुरु आहे.

सोमवारी रात्रीपासून १९ जुलैपर्यंत कुरण गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून नागरिकांचे आगमन व प्रस्थान, तसेच वाहने प्रतिबंधित करण्यात आली आहेत.

नजीकच्या समनापूर येथील ग्रामस्थांनी मंगळवारपासून स्वयंस्फूर्तीने १० दिवस गाव बंद केले आहे.परिसरातील अन्य काही गावेही बंद करण्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment