ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : महानगरपालिकेत कोरोनाचा शिरकाव !

0

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच महानगरपालिकेतील नगर रचना विभागातील एका कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबबत सविस्तर वृत्त असे कि, नगर रचना विभागातील कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून आजारी होता. त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

Advertisement

त्याची कोरोनाची चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळामध्ये, कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नगर शहरातील नागरिकांसह नगरसेवक, पदाधिकार्‍यांची नेहमीच महापालिकेत वर्दळ असते. कोरोनाचा शिरकाव महापालिकेत झाला असल्याने या सर्वात खळबळ उडाली आहे.

Advertisement

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li