पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस; मुळा,भंडारदरा, निळवंडेत ‘एवढा’ पाणीसाठा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :   सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत.

पाण्याची आवक सुरु असल्याने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणामध्ये पाण्याची आवक वाढत चालली आहे. उत्त्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे निळवंडे धरण काल रात्री ५० टक्के भरले.

पाऊस सुरू असल्याने धरणात काल दिवसभरात 28 दलघफू पाणी आले. 8 हजार 300 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 6 वाजता 4 हजार 147 दलघफू पाणीसाठा झाला होता.

अर्थात धरणात गेल्यावर्षीचा साठा शिल्लक होता. भंडारदरा पाणलोटात पाऊस सुरू असल्याने धरणात नव्याने पाणी दाखल होत आहे.

गत 36 तासांत धरणात 330 दलघफू पाणी आल्याने सायंकाळी धरणातील पाणीसाठा 3 हजार 657 दलघफू झाला होता. वाकी ओव्हरफ्लो 256 क्युसेकने सुरू आहे.

मुळा पाणलोटातही पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील मुळा नदीतील पाणी वाहते आहे. सकाळी कोतूळ येथे 1 हजार 273 क्युसेकने पाणी होते.

९४१.८८ दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या मुळा धरण साठ्यातही हळूहळू वाढ होत आहे. गत 24 तासांत धरणात नव्याने 153 दलघफू पाणी दाखल झाल्याने काल सकाळी हे धारण 31.15 टक्के भरले होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment