ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : शेततळ्यात बुडून चुलत भाऊबहिनीचा अंत

0

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :  नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील पठारवस्तीवर गुरे चारतांना वस्तीजवळील शेततळ्यात बुडुन सख्याचुलत भाऊबहिणीचा मृत्यु झाला.

ही दुर्घटना शुक्रवार दि १० जुलैला दुपारी दोनच्या दरम्यान घडली. तुषार राजेंद्र पवार ( वय १३ वर्ष) व संस्कृति संदिप पवार ( वय ९ वर्ष )असे त्या दोघांची नावे आहेत.

Advertisement

या घटनेची माहिती कळताच चिचोंडी पाटील परिसरात शोककळा पसरली. दोघाचे मृतदेह उत्तरीय तपासणी साठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.

चिचोंडी पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र रघुनाथ पवार यांचा मुलगा व त्यांचे बंधु संदीप रघुनाथ पवार यांची मुलगी होत.

Advertisement

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li