ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

माजी आमदार विजय औटींची शिवसेनेतून हकालपट्टी करा

0

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :  गेल्या वर्षी आमदार विजय औटींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळावा संपल्यानंतर ठाकरेंच्या वाहनांच्या ताफ्यावर औटी समर्थकांनीच दगडफेक केली होती,

असा गौप्यस्फोट शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या व पुन्हा शिवबंधनात अडकलेल्या पाच नगरसेवकांसह महिला आघाडी तालुकाप्रमुख उमा बोरूडेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

Advertisement

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर औटींनी पक्षाकडे पाठ फिरवली. पक्ष संघटनेचा उपयोग केवळ स्वर्थासाठी, सगेसोयऱ्यांच्या हितासाठी व अधिकाऱ्यांना दमबाजी करण्यासाठी ते करत.

शिवसेनेची बदनामी होत असल्याने औटींची पक्षातून हकालपट्टी करावी, निष्ठावान शिवसैनिकाच्या हाती सूत्रे सोपवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

नगरपंचायतीच्या कारभारात औटींनी नेहमीच स्वयंकेंद्रित राजकारण केल्यामुळे गेल्या साडेचार वर्षांत शहराचा विकास होऊ शकला नाही.

नगरपंचायतीस जाणीवपूर्वक निधी उपलब्ध होऊ दिला नाही. नाराजी वाढून परिणामी नगरपंचायतीची सत्ता शिवसेनेच्या हातून गेली, असेही निवेदनात म्हटले आहे.

Advertisement

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li