ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

धक्कादायक ! ‘या’ भाजप खासदारास कोरोनाची लागण

0

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :  भारतात कोरोनाने धमाकूळ घातला आहे. जनसामान्यांबरोबर अनेक बड्या लोकांनाही कोरोनाने ग्रासले आहे. नेते मंडळीही यापासून दूर राहू शकली नाहीत.

आता भारतीय जनता पक्षाचे भिवंडी मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी कपिल पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Advertisement

याआधी पुण्यात महापौर, उपमहापौर यांच्यासह भाजप आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच धनंजय मुंडे यांनाही कोरोनाने ग्रासले होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Advertisement

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li