Ahmednagar NewsAhmednagar SouthCorona Virus Marathi News

‘त्या’ अधिकार्‍याच्या घरातील भाऊ व वडील पॉझिटीव्ह

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा विस्फोट होत असतानाचे चिंताजनक चित्र असताना आता श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

श्रीरामपूर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 42 वर जावून पोहोचली आहे. काल (गुरुवार) पुन्हा शिरसगाव (हरेगाव फाटा) व अशोकनगर फाटा या ठिकाणी दोन

तर श्रीरामपूर शहरातील ‘त्या’ अधिकार्‍याच्या घरातील भाऊ व वडील अशाप्रकारे चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

अशोकनगर फाटा परिसरातील तरुण पॉझिटिव्ह आढळल्याने त्याच्या संपर्कातील घरातील 5 व त्याचे 2 मित्र अशा सात जणांना वैद्यकीय तपासणीसाठी हलवण्यात आले होते.

या सात जणांचे अहवाल प्राप्त होऊन पैकी त्याचे दोन मित्र पॉझिटिव्ह आढळून आले आहे. पैकी एक शिरसगाव तर एक वडाळा महादेव परिसरातील आढळून आला आहे.

हे दोघेही औरंगाबाद येथून आले होते. तसेच श्रीरामपूर शहरातील ‘त्या’ अधिकार्‍याचे वडील व भाऊ या दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

आता या अधिकार्‍याच्या घरातील करोनाबाधितांची संख्या 9 झाली आहे. अद्याप 46 अहवालांची प्रतिक्षा आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button