Breaking

थोडसं मनातलं… लाॅकडाऊनचा काळ आणि बेकायदेशीर धंद्याचे नगरी जुगाड .. ॲड शिवाजी अण्णा कराळे

Best Sellers in Electronics

नमस्कार मित्रांनो.
जगात कोरोना थैमान घालतोय. भारतातील व महाराष्ट्रातील कोविड-19 ची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे तसेच दररोज अनेक रूग्ण बरे होत आहेत तर अनेक जण मयत झाले आहेत. कोरोना हा संसर्गजन्य विकार आहे. त्याचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. तसेच सरकारने 31 जुलै 2020 पर्यंत लाॅकडाऊन आणि संचारबंदी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना ग्रस्तांची संख्या आहे. या कोरोना नावाच्या संसर्गजन्य विकाराने अनेक जवळचे नातेवाईक सुद्धा दुरावले आहेत. कोरोना जातपात आणि धर्म पहात नाही. लाॅकडाऊन व संचारबंदी असताना सुद्धा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात गंभीर गुन्हे दाखल होत आहेत.

अवैध्य धंद्याचे प्रमाणात खुप मोठी वाढ झाली आहे हे वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या वरून समजते. जुगार, दारु, बलात्कार, खून, मारामारी, अल्पवयीन मुलीवर अत्याचार असे एक ना अनेक प्रकारचे गुन्हे घडले आहेत. अर्थात पोलीसांनी वेळीच पायबंद घातला आहे. आरोपी अटक पण केले आहेत. तसेच त्यांचेवर गुन्हा पण दाखल करण्यात आले आहेत.परंतु प्रश्न पडतो की, संपूर्ण देशात लाॅकडाऊन आणि जमावबंदीचे आदेश असताना लोक अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करतातच कसे? कोणाच्या आशीर्वादाने आणि हिमतीवर बेकायदेशीर धंदे चालू आहेत. बर आरोपी पकडले तर मुख्य आरोपी फरारच कसा होतो?

जमावबंदीचे आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे. तसेच नियमाचे उल्लंघन केले जात आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कर्मचारी कुठे तरी कमी पडतात का हा प्रश्न कधी कधी निर्माण झाला आहे. प्रत्येक पोलिस स्टेशन च्या हद्दीत अवैद्य धंदे आहेतच. लाॅकडाऊन च्या काळात सुद्धा भ्रष्टाचार कमी झाला नाही. एक तलाठी आणि एक वायरमन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. हे अवैद्य धंद्याचे नगरी जुगाड बंद करायचे असेल तर प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागेल. बिचारे जबाबदार नागरिक सर्व नियम पाळूनच रहातात परंतु बेजबाबदार नागरिक नियमाचे उल्लंघन करतात.

दारू विक्री ला सरकारने आता आता परवानगी दिली परंतु लाॅकडाऊन च्या काळात अनेक दारु ची प्रकरणे उघडकीस आणली. त्या मध्ये पाथर्डीतील बेकायदेशीर दारू प्रकरण आहे, तसेच दारू उत्पादन शुल्क विभागाने दारू पकडली. म्हणजे एक मात्र निश्चितच आहेकी, अवैद्य धंद्याचे नगरी जुगाड वेगळेच आहे. आणि आता पर्यंत त्या नगरी जुगाडावर कोणीच हातोडा मारला नाही. प्रशासनाचे रुग्णवाहिकेस पेशंट ची ने आण करण्याकरिता परवानगी दिली होती.

परंतु रुग्णवाहिका मधून दारूची वहातूक करताना काही लोकांना पोलीसांनी पकडले. एवढेच नव्हे तर तर अगदी स्कूल बस मधून सुद्धा दारु वाहीली गेली. भाजीपाला आणि फळाची वहातूक करताना टरबूजा खाली मांस आणि सुगंधी तंबाखू म्हणजे मावा सापडला. म्हणजेच बेजबाबदार लोकांनी ठरवले आहेच की पोलीसांनी दिलेले आदेश धाब्यावर बसवून बेकायदेशीर धंदा करायचाच. होऊन होऊन गुन्हा दाखल होईल, फाशी तर होणार नाही ना अशीच भावना या धंदेवाल्यांची झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. लाॅकडाऊन आणि संचारबंदी च्या काळात सुद्धा सर्व बेकायदेशीर व्यवसाय सुरू होतेच. बेकायदेशीर धंदा करणारे लोकाचे नगरी जुगाड वेगळेच आहे. अहमदनगर शहरात नेहमीच अशा गोष्टी पहायला मिळतात.

अगदी अतिक्रमण काढले तरी एका तासात पुन्हा जैसे थे परिस्थिती पुन्हा निर्माण होते. आता या लाॅकडाऊन व संचारबंदी च्या काळात अनेक अवैद्य धंदा करणारे लोक पकडले गेले. अनेक राशन दुकानदारानी लोकांना रेशन दिले नाही. परस्पर राशनची विल्हेवाट लावली म्हणून काही दुकानावर कारवाई झाली. वास्तविक पाहता या परिस्थितीत असे धंदे करायला नको होतं. आपण सर्वजण कोरोना सारख्या महामारी ला सामोरे जात असताना अशा घटना घडतातच कशा? या लोकांची बेकायदेशीर धंदा करण्याची हिंमत होतेच कशी हा अनुत्तरीत प्रश्न निर्माण झाला आहे.

कधी शासकीय अधिकारी यांना मारहाण तर कधी डाॅक्टर आणि नर्स यांना मारहाण. कधी पोलिसाना मारहाण असे एक ना अनेक प्रकारचे गुन्हे घडले आहेत. जामखेड मध्ये तर हाॅटस्पाॅट असताना देखील खंडणीचे व खूनाचे प्रकार घडले आहेत .अनेक दुकानदार चढ्या भावात मालाची विक्री करायला लागले म्हणून तक्रारीकेल्या आहेत, तर कधी कधी राशन दुकानदारानी राशन देण्यास नकार दिला म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले. पत्रकार मंडळी ने दिलेल्या बातमी बाबतीत काही ठिकाणी तक्रार केली आहे. मारामारी, चोरी, खंडणी आणि खुन असे गुन्हे घडले आहेत.

खरं तर संचारबंदी आणि लाॅकडाऊन असल्याने सर्व नागरिक आपापल्या घरी आहेत. पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन कठोर कारवाई करत असताना सुद्धा असे एक ना अनेक प्रकारचे गुन्हे घडले आहेत. रस्त्यावर विनाकारण फिरणारे, थुंकणारे तसेच मास्क न वापरणारे कडून दंड वसूल केला आहे. कधी कधी हा प्रश्न निर्माण झाला आहे की, प्रशासनाचा आणि पोलिसाचा वचक कमी तर झाला नाही ना. मावा, गुटखा, दारू लाॅकडाऊन व संचारबंदी लागू असताना लोकांना मिळतेच कशी हा अनुत्तरीत प्रश्न निर्माण झाला आहे. लोक एवढी हिम्मत कोणाच्या जिवावर करतात. का कुंपनच शेत खातय काही कळत नाही. हा काळ तसा सर्वांनी मिळून काम करण्याचा आहे.

कोरोना हा जातपात, धर्म पहात नाही. त्याला हरवायचे असेल सर्व मिळून काम करणे गरजेचे आहे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते. जे लोकं गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत त्यानां धडा शिकवला पाहिजे. खरं तर आपला जीव वाचवण्यासाठी प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेले नियम पाळले पाहिजे. गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिस प्रशासन यांनी कडक धोरण अवलंबित केले पाहिजेत. तरच जनता सुरक्षित राहील.
नियमाचे उल्लंघन करणे योग्य नाही.

सध्या देश फार मोठ्या संकटाला तोंड देत. संपूर्ण देशभर कोरोना थैमान घालतोय. त्यामुळे सरकारने 31जुलै 2020 पर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला. आपल्या भागात जर अनोळखी लोक दिसले तर त्याची माहिती प्रशासनाला द्यावी.प्रशासन आपल्या सोबत आहे. त्याची काळजी नागरिकांनी करू नये.पण लोकांनी सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे, रस्त्यावर न थुंकणे, अफवा न पसरविणे इ. नियम पाळले पाहिजे. जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन, समाजसेवक, शिक्षक मंडळी, लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन, बॅंकेचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार मंडळी, डाॅक्टर आणि नर्स, सफाई कर्मचारी आपले जीव धोक्यात घालून सर्व शासकीय अधिकारी काम करतात. नागरिकांनी घराबाहेर पडू नये हिच अपेक्षा. प्रशासनाला सहकार्य करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.

ॲड शिवाजी अण्णा कराळे
सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर
99 22 545 545

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button