अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर शहरात आणखी २ कंन्टेन्मेंट झोन वाढले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  अहमदनगर शहरातआणखी २ कंन्टेन्मेंट झोन वाढले असून बागरोजा हडको व बुरूडगावरोड वरील चाणक्य चौकाजवळील नंदनवन कॉलनी भागात कोरोनाचा संसर्ग होवून कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी हे दोन्ही परिसर २४ जुलै पर्यंत कंन्टेन्मेंट झोन तर त्या भोवतालचे परिसर बफर झोन जाहीर केले आहेत.

बागरोजा हडको कंन्टेन्मेंट झोन –

नेप्ती नाका चौक ते बालीकाश्रम रस्त्यावरील तानवडे पॅथोलॉजीकल लॅब, पटेल टायर्स, राजीव गांधी पतसंस्था, अरुण दुर्गे यांचे घर, गृहशिल्प हौसिंग सोसायटीची दक्षिण बाजु, सखी अपार्टमेंट शेजारील नंदु गायकवाढ याचे घर, बागरोजा हडकोचा पश्चिमेकडील परिसर, स्वामी साडी सेंटर श्री.घेगडे यांचे घर, बागरोजा हडकोची दक्षिण बाजु, स्वामी बंगला, स्वानंद जनरल स्टोअर्स, श्री.कूकडे यांचे घर ते तानवडे पॅथोलॉजीकल लॅब.

बागरोजा हडको बफर झोन –

सातभाई मळा, विदयाविहार कॉलनी, गृहशिष्य सोसायटी, बागरोगा हडकोचा पश्चीमेकडील परिसर, दातरंगे मळा, मनपाचे संभाजी महाराज व्यापारी संकुल परिसर, नालेगाव म्युन्सिपल हडको वसाहल ते सातभाई मळा.

नंदनवन कॉलनी कंन्टेन्मेंट झोन –

आयटीआय कॉलेज समोरील नंदनवन कॉलनी.

नंदनवन कॉलनी बफर झोन –

चाणक्य चौक,स्वाती कॉलनी, हॉटेल वैभव परिसर, डॉ. शिंदे हॉस्पीटल परिसर, राष्ट्रीय पाठशाळेच्या मिळकतीचा परिसर, शासकीय  पॉलिटेक्निक कॉलेज व आयटीआय चा परिसर.

या झोनमध्ये सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री सेवा बंद राहणार आहेत तसेच या परिसरात नागरिकांच्या संचारावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे.

कन्टेन्मेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बफरझोनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment