अहमदनगर ब्रेकिंग : इंदोरीकरांच्या समर्थकांनी पुरावे नष्ट केले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  यू-ट्यूबवरील व्हिडीओ व कागदपत्रांचा पुरावा गृहित धरून निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना न्यायालयाने ७ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आरोपीने किंवा त्यांच्या आदेशावरून समर्थकांनी पुरावे नष्ट केले, अशी तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली.

पत्रकात म्हटले आहे, आमच्या मागणीवरून १९ जूनला घुलेवाडीचे आरोग्य अधिकारी डॉ. भास्कर भवर यांनी पीसीपीएनडीटी अ‍ॅक्टनुसार संगमनेर कोर्टात फिर्याद दाखल केली.

३ जुलैला त्यावर सुनावणी होऊन इंदोरीकर महाराजांना ७ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले. इंदोरीकर महाराजांचे व्हिडीओ ३ जुलैपर्यंत यू-ट्यूबवर होते.

मात्र, हजर राहण्याचे आदेश होताच महाराजांच्या समर्थकांनी ते नष्ट केले. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना कायद्याचे उल्लंघन करत समर्थन करणारी खोटे निवेदने वतर्मानपत्रांतून येत आहेत.

त्यांचे समर्थन करणारे लेख देऊन साक्षीदार, फिर्यादी व न्याययंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. समर्थक-लाभार्थी साक्षीदाराबाबत अपशब्द वापरत आहेत.

त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांनी न्यायालयात इंदोरीकर महाराजांचे समर्थक व लाभार्थ्यांवर तक्रार दाखल करावी, असे अ‍ॅड. गवांदे यांनी म्हटले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment