ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

‘पक्षांतर करणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकांनी काय दिवे लावले?’

0

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  ऐन निवडणुकीच्या तोंडावर पारनेरच्या नगरसेवकांनी पक्षांतरन केल्याने जे राजकीय नाट्य झाले ते महाराष्ट्राने अनुभवले. अवघ्या ५ दिवसात हे नगरसेवक राष्ट्रवादीत जाऊन पुन्हा शिवसेनेमध्ये आले.

या नगरसेवकांनी विकासाचा मुद्दा ठेऊन पक्षांतरण केले असे म्हटले जाते. हाच धागा पकडत माजी उपनगरध्यक्ष चंद्रकांत चेडे व उद्योजक अर्जुन भालेकर यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत.

Advertisement

ते म्हणतात, गेल्या साडेचार वर्षात आपआपल्या प्रभागात काय दिवे लावले? गेल्या साडेचार वर्षात त्यांनी विकासाचा विचार का केला नाही? सत्तांतर झाल्यानंतरच विकास का डोक्यात घुसला ?

विधानसभा निवडणूकीत नेतृत्व पराभूत झाल्यानंतर यांना विकास कळाला का ? नगरपंचायतीच्या मासीक सभांमध्ये पाच पैकी किती नगरसेवकांनी पाणी योजनेसंदर्भात प्रश उपस्थित केले ? किती प्रस्ताव सादर केले ?

Advertisement

कोणास निवेदन दिले ? त्या नगरसेवकांनी स्वतःच सभांचे इतिवृत्त जनतेसमोर मांडावे असे आव्हान चेडे व भालेकर यांनी दिले.

विधानसभा निवडणुकीत विजय औटी पराभूत झाले आणि कर्तृत्वशून्य नगरसेवकांना ते लगेच वाईट कसे वाटू लागले ? विधानसभा निवडणुकीत कुटुंबासह प्रचार करणारे, औटी हेच मतदारसंघाचे भाग्यविधाते आहेत असे घसा ताणून सांगणारे औटी पराभूत होताच राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले.

Advertisement

याचाच अर्थ स्वतः च्या स्वार्थासाठी ते तत्कालीन नेत्यांची खूषमस्करी करतात हे त्यांच्या कृतीतून सिद्ध झाले आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Advertisement

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li