मनसेचे ‘ते’ नेते इंदोरीकर महाराजांच्या भेटीस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  घातक रूढी, परंपरांवर आसूड ओढून समाजजागृतीचे काम करणारे निवृत्ती महराज देशमुख यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेतला नाही तर सर्व साधु, संत, वारकरी संप्रदायातील लोक व सामाजिक संघटना रस्त्यावर उतरतील असा इशारा महंत योगी केशवबाबा चौधरी वीरगावकर यांनी दिला.

ही घटना ताजी असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजीत पानसे यांनी महाराजांच्या संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक येथील घरी जाऊन शनिवारी ( ११ जुलै) समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांची भेट घेतली.

भेटीनंतर पानसे म्हणाले, एखाद्या छोट्या चुकीची दिलगिरी महाराजांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या कीर्तनातून समाजप्रबोधनाचे चांगले कार्य घडत आहे.

त्यांनी स्वत:ची शाळा काढली आहे. त्यांचे हे मोठे कार्य आपण विसरणार आहोत का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment