कौतुकास्पद! ३५ गुंठ्यात शेतकऱ्याने कमावले पाच लाख;केले असे काही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  शेतीमध्ये आधुनिक प्रयोगाचा वापर करत संगमनेर तालुक्यातील अकलापूरच्या शेळकेवाडी येथील शेतकऱ्याने ३५ गुंठ्यात तब्बल ५ लाखांचे उत्पन्न घेतले आहे.

लॉक डाउनच्या काळात कोलमडलेल्या शेतकऱ्यांसाठी या युवा शेतकऱ्याने आदर्श निर्माण केला आहे. बाजारपेठेतील मागणीनुसार उत्पन्न घेतल्यास शेतक-याला नफा झाल्याशिवाय राहत नाही.

या सर्व परिस्थितीचा अंदाज घेत वैभव शिवाजी भोर या शेतकऱ्याने लॉकडाऊनच्या अडचणीवर मात करत टोमॅटो पिकातून लाखोंचे उत्पादन घेतले.

संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथील युवा शेतकरी वैभव भोर यांनी यावर्षी ३५ गुंठ्यात टोमॅटोची लागवड केली. साधारणत: एप्रिल महिन्यात टोमॅटो बियाणे आणून रोपे तयार करून शेतात मल्चिंग टाकून लागवड केली.

४ बाय २ बेड अशा पद्धतीने सव्वा फूट अंतरावर दोन रोपांची लागवड केली. ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचे आणि खताचे नियोजन केले.

हवेतील आर्द्रता कमी करण्यासाठी स्प्रिंकलरचा उपयोग केला आहे. ५० टक्के रासायनिक व ५० टक्के सेंद्रिय पद्धतीची औषधे त्यांनी वापरली. त्यामुळे टोमॅटोचे पीक जोमात आले.

३५ गुंठ्यात भोर यांना आजपर्यंत बाराशे कॅरेट टोमॅटोचे उत्पादन मिळाले. आणखी पाचशे ते सहाशे कॅरेट अधिक उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे.

३५० ते ६५० रुपये एका कॅरेटला भाव मिळत आहे. यासाठी दीड लाख रुपये खर्च झाला. खर्च वजा करून जवळपास पाच लाखांचे उत्पन्न टोमॅटोतून मिळणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment