ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना झाल्याचे लपवले ; तिघांवर गुन्हा दाखल

0

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : कोरोनाची बाधा झालेली असताना व इतरांच्या जीवीताला धोका निर्माण करणे, जिल्हाधिका-यांच्या आदेशाचा भंग करुन विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश करणे,

आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करणे , साथरोग अधिनियमाचे उल्लंघन करणे याबाबत तिघाजणाविरु्दध पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

याबाबत पाथर्डी पोलिसात पोलिस कर्मचारी अच्युत चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. पुणे (कात्रज) येथुन कोरोनाची लागण झालेली माहीती असताना दोन महीला व एक पुरुष असे तिघेजण पाथर्डी येथे ११ जुलै २०२० रोजी आले.

पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात ते सध्या उपचार घेत आहेत. तिघांना त्यांना कोरोना झाला हे माहीत असताना त्यांनी पुणे येथे उपचार न घेता इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे कृत्य केले.

Advertisement

पुणे येथुन येताना त्यांनी परवानगी घेतली नाही. जिल्हाधिका-यांच्या आदेशाचा भंग केला. आपत्ती व्यवस्थापन व कोवीडच्या बाबतीत असलेले नियम पाळले नाहीत म्हणुन तिघाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Advertisement

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li