अहमदनगर ब्रेकिंग : ‘ह्या’ ठिकाणी आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारातील विहिरीत एका अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला असुन. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.

Advertisement

संपत विष्णू मगर हे त्यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये रविवारी दुपारी गेले असता त्यांना एका विहीरीजवळून जाताना दुर्गंधी आली.

त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना अनोळखी २५ ते ३० वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. सदर महिलेची आत्महत्या की घातपात झाला? याची माहिती समजू शकली नाही.

Advertisement

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement