Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi NewsMaharashtra

अहमदनगर ब्रेकिंग : ‘तो’ संदेश खोटा…शेअर केल्यास होईल कारवाई !

अहमदनगर Live24 टीम (13 जुलै 2020  11.07 PM) :अहमदनगर शहरात आज एक संदेश व्हायरल होत असून यात 16 तारखेपासून जनता कर्फ्यू लागू होणार असल्याचे सांगितले आहे, मात्र तो संदेशच खोटा असून अश्या प्रकारचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झाले असून कोणीतरी खोडसाळ पणा केल्याचे समोर आले आहे.

याबाबत अहमदनगर सायबर पोलिसांकडून फेक मेसेज ग्रुप वर सेंड करणारे इसमावर लक्ष असून फेक मेसेज सेंड व फॉरवर्ड  करणार्यांवर त्यांचेवर प्रचलित कायद्यावे कारवाई करण्यात येणार आहे.

आज दुपार नंतर खालील प्रमाणे फेक मेसेज forword होत आहे

महत्वाचा मेसेज मित्रांनो
आज दुपारी बारा वाजता आयबी बंगल्यावर सोळा तारखेपासून नगर शहरात जनता कर्फ्यू लागू करण्यासंबंधी मीटिंग आयोजित करण्यात आली होती, त्या मिटिंग मध्ये मा. आमदार संग्राम भैया जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मिटींगसाठी मलाही बोलावले होते, सदर मिटींगला मनपा गटनेता, विरोधी पक्षनेता,मनपा आयुक्त, पोलीस प्रमुख, व मनपा अभियंते उपस्थित होते, सुमारे दोन तास चाललेल्या या मिटींगमध्ये असा ठराव पुढे शासनाला पाठवायचे ठरले आहे की दिनांक 16 जुलै पासून सात दिवस व त्या परीस्थितीमध्ये फरक न झाल्यास त्याही पुढील सात दिवस, अहमदनगर शहरांमध्ये कडक लाॅक डाऊन अर्थात जनता कर्फ्यू लागू करण्यात येईल, त्यासाठी आपल्या सभासदांना अगोदरच पूर्वसूचना म्हणून सदरचा मेसेज मी करत आहे, की येत्या एक दोन दिवसात महत्त्वाची कामे घरातील कमी-अधिक सामान,औषधे भाजी याचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे, कारण सात दिवस रस्त्यावर २४ तास कडक कर्फ्यु असणार आहे, कुणालाही मेडीकल इमर्जन्सी व्यतिरिक्त फिरणे शक्य नाही, याची सर्वांनी नोंद घेऊन योग्य ती उपाययोजना करावी,
सुरक्षित रहा घरीच रहा कारण आताच्या मीटिंगमध्ये मला जी वास्तवता समजली आहे ती कल्पनेच्या पलीकडे भयानक असून आपण सर्वांनी आपली व कुटुंबियांची सुरक्षितता पाळायला हवी

वरील प्रमाणे खोटे मेसेज हे अहमदनगर जिल्ह्यातील लोकांना
त्याचे व्हाट्सअप ग्रुप वर खोटा संदेश forword होत आहे
तरी असे लोकांवर सायबर पोलिसांचे लक्ष असून त्याचेवर कारवाई करण्यात येत आहे तरी कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये व वरील प्रमाणे खोटे msg दुसऱ्या कोणालाही Whatsapp ग्रुप ला सेंड करू नका व अफवा पसरू नका तसे केल्यास
त्याचेवर कारवाई करण्यात येईल

 – पोलीस निरीक्षक
सायबर पोलीस स्टेशन अहमदनगर

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close