विधानसभेचा आमदार नसलो तरी सर्वसामान्य जनतेचा असल्याने विकासपर्व सुरुच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : बुर्‍हाणनगरचा सरपंच असल्यापासून लोकांचे प्रश्‍न सोडविणे, गावाचा, परिसराचा विकास करणे ध्येय ठेवून त्याची पुर्तता केल्याने सर्वसामान्य जनतेने गेली 25 वर्षे कामाची पावती म्हणून मला आमदारकी बहाल केली होती.

आता जरी विधानसभेचा आमदार नसलो तरी सर्वसामान्य जनतेचा मनात मी आमदार राहिल्याने विकासकामे करणे हे कर्तव्य समजून हे विकास पर्व सुरुच राहील,

असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले. बुर्‍हाणनगर ग्रामपंचायतीच्यावतीने कचरा गोळा करण्यासाठी नवीन घंटागाडीचे लोकार्पण श्री.कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बुर्‍हाणनगरचे उपसरपंच बाळासाहेब कर्डिले, राजाराम कर्डिले, श्रीधर पानसरे, रावसाहेब कर्डिले, तात्या कर्डिले, किशोर कर्डिेले, तसेच नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, बाळासाहेब पवार,

शिवाजी पालवे, डॉ.दरंदले, रामदास काकडे आदि उपस्थित होते. माजी आ.कर्डिले पुढे म्हणाले, गेली 25 वर्षे जनतेने मला जेवढे प्रेम दिले, त्या जनतेच्या पाठिंब्यावरच मंत्रीपद मिळाले होते.

त्याचा उपयोग मी जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी केला, आजही जनतेचा मनात आमदार म्हणून कार्यरत आहे. राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघातील सर्वसामान्य लोक माझ्याकडे आपले प्रश्‍न घेऊन येतात

ते सोडविल्यामुळे त्यांचा मनात मी माजी आमदार म्हणून नव्हे तर आमदार म्हणूनच मला ओळख देतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा समजतो.

बुर्‍हाणनगर ग्रामपंचायत हद्दीतील वाढती उपनगरे लक्षात घेऊनच या परिसरातील पाणी, रस्ते, वीजेचा प्रश्‍न सोडविले. आता स्वच्छ भारत.. समृद्धा भारत करण्यासाठी कचरा संकलनासाठी घंटागाडी सुरु झाली आहे.

लोकांनी त्याचा उपयोग करावा. घर जसे स्वच्छ ठेवता तसा परिसर स्वच्छ ठेवा. लवकरच ज्या भागात ड्रेनेजचा प्रश्‍न राहिला आहे, तो सोडविण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

यावेळी अमोल धाडगे, सचिन फाळके, सोमनाथ नजन, देशमाने, कांडेकर, टकले, राऊत, झिने गजराजनगर, तपोवनरोड, साईनगर, शिवाजीनगर, उपनगरातील नागरिक, महिला उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment