अहमदनगर मध्ये कोरोना दंडापोटी साडे एकवीस लाखांची वसुली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : कोरोना रोखण्याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा महत्वाचा भाग म्हणून जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच मास्क लावणे बंधनकारक आहे.

जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे अनेकांना महाग पडले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे.

मागील अडीच महिन्यांच्या काळात ६ हजार ७५१ जणांकडून तब्बल २१ लाख ३३ हजार ५५० रुपये दंडापाेटी वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी दत्तात्रय लांघी यांनी दिली.

मागील चार महिन्यांपासून कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सरकार व प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. शासन निर्देशानुसार विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी करण्यात आल्या आहेत.

यात स्वच्छतेची दक्षता , सोशल डिस्टंटचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. कोरोनावर मात करणारे औषध अधिकृतपणे निर्माण होत नाही तो पर्यंत कोरोना संक्रमण साखळी तोडण्यावरच भर रहाणे सहाजिक आहे.

याच दृष्टीकोनातून सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई, मास्क लावणे बंधनकारक असून कोरोनाचा संसर्ग रोखणे हाच यामागे हेतू आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment