ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : चोरी करण्यास विरोध केल्याने निर्घृण हत्या !

0

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :चोरी करण्यास विरोध केल्याने तिघांनी सुपा येथे एका व्यक्तीची कुर्‍हाड, भाला, लाकडी दांडक्यानी मारहाण करत धिसीम निचकी घिसाडी (वय 50) या इसमाची निर्घृण हत्या केल्याची घटना पारनेर तालुक्यात घडली आहे. 

याबाबत पाशम धिसीम घिसाडी (वय 25, रा. सुपा) यांनी सोमवार 13 जुलै रोजी सुपा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी व माझे पती सुपा येथे भंगार सामान विकण्याचा छोटा धंदा करत आहोत.

Advertisement

आमच्या शेजारी काही कुंटुब रहात होते. त्यांच्या काही संशयास्पद हालचाली पाहून माझे पती त्यांना म्हणाले ‘तुम्ही चोर्‍या करत जाऊ नको, त्याच्या आम्हाला त्रास होतो’ असे समजावून सांगितल्याचा राग येऊन

त्यांनी रात्री 7.30 च्या दरम्यान वल्ली व्यंकेस भोसले, शेकू व्यंकेस भोसले व रुक्मिणी व्यंकेश भोसले यांनी आमच्या राहत्या घरासमोरच शिविगाळ करत जबर मारहाण केली.मारहाण इतकी जोरदार होती की ते जागीच शांत झाले होते. अशी फिर्याद दिली.

Advertisement

सुपा पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी भेट देत मारहाण झालेल्या व्यक्तीला तात्काळ पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवले तेथे ते मूत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Advertisement

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li