ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

माजी आमदार राहुल जगताप झाले आक्रमक म्हणाले….

0

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : नगर-दौंड महामार्गाचे सुमारे ६५० कोटींचे काम झाले. तथापि, या कामात दर्जा न राखल्याने कोळगाव व ठिकठिकाणी मोठे खड्डे व भेगा पडल्या आहेत.

त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दिनेशचंद्र आर अग्रवाल या कंपनीच्या ठेकेदाराने त्वरित दुरुस्ती करावी; अन्यथा कोळगाव येथे रस्ता बंद करण्याचा इशारा माजी आमदार राहुल जगताप यांनी सोमवारी दिला.

Advertisement

महामार्गाचे काम गेल्या २ वर्षांपासून सुरू असून काही भाग वगळता श्रीगोंदे तालुक्यात काम पूर्ण झाले आहे. अंदाजपत्रकानुसार हे काम झालेले नाही.

निकृष्ट दर्जामुळे श्रीगोंदे व नगर तालुक्यात ठिकठिकाणी मोठे खड्डे व भेगा पडल्या आहेत. त्यामुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होतात.

Advertisement

काही ठिकाणी साईडपट्ट्या नसल्याने किंवा खचल्याने रात्री वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊन प्रवासी मृत्युमुखी पडतात.

ठेकेदाराने त्वरित दुरुस्ती करावी; अन्यथा कोळगाव येथे रस्ता बंद करून आंदोलन करण्याचा इशारा जगताप यांनी दिला.

Advertisement

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li