ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

निम्म्यापेक्षा अधिक नगर लॉकडाऊन …

0

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : नगर शहरात करोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने चितळेरोड आणि सावेडीतील भिस्तबाग चौकात नव्याने कंटेनमेंट झोन घोषित केलाय.

चितळेरोडच्या कंटेनमेंट झोनची मुदत दि. २५ तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत, तर भिस्तबाग येथील कंटेनमेंची मुदत दि. २६ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत असेल.

Advertisement

दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत कंटेन्मेंट झोनमुळे निम्म्यापेक्षा अधिक नगर शहर लॉकडाऊन झाले आहे. मार्चपासून आजपर्यंत नगर शहरात आजपर्यंत ४६ कंटेनमेंट झोन महापालिकेने केले.

मुकुंदनगरपासून ते माळीवाडा, झेंडीगेट, केडगाव, नालेगाव, तोफखाना, दाळमंडई, सथ्था कॉलनी, भवानीनगर येथे टाकलेले कंटेनमेंट झोन पहिल्यादांच सावेडीत पोहचला.

Advertisement

कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता वेळप्रसंगी नगर शहर लॉकडाऊन करण्याचा पर्याय महापालिका प्रशासनाने समोर ठेवला असल्याची माहिती आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिली.

नगर शहरासह उपनगरात करोनाबांधिताची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहराच्या चारही बाजूने नव्याने करोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यातच नगरसह उपनगरातदेखील करोनाने हातपाय पसरले आहे.

Advertisement

बाधित परिसरदेखील महापालिका तातडीने सील करत आहे. नगर शहरातील अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या दोनशे पार गेली आहे.

दरम्यान, रविवारी महापालिका प्रशासाने भिस्तबाग, श्रमिकनगर, लक्ष्मीकारंजा परिसराची पाहणी केली. त्यानंतर लगेचच चितळे रोड परिसरातील लक्ष्मीकरांजा कंटेन्मेंट झोन घोषित केला.

Advertisement

दरम्यान, नगर शहरात सध्या सिद्धार्थनगर, तोफखाना, पद्मानगर, बागरोजा हडको, कवडे नगर, नंदनवन कॉलनी (बुरुडगाव रोड), लक्ष्मी कारंजा असे सात कंटेन्मेंट झोन आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Advertisement

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li