ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

संगमनेर बाजार समितीतील कांदा मार्केट नऊ दिवस बंद

0

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : संगमनेर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुर्भाव पाहता संगमनेर बाजार समितीतील हमाल व मापाडी यांनी कांदा मार्केट बंद ठेवण्याबाबत प्रशासनाला निवेदन दिले होते.

रविवारी संचालक मंडळाची तातडीची बैठक होऊन कोरोना प्रतिबंध उपाययोजना म्हणून १२ ते २० जुलैदरम्यान ९ दिवस कांदा मार्केट बंद ठेवण्यात निर्णय झाल्याची माहिती सभापती शंकरराव खेमनर यांनी दिली.

Advertisement

कुरणमध्ये बाधितांची संख्या ४९ झाली असून तालुक्याचा आकडा २२३ झाला आहे. कुरण व तालुक्यातील व्यापाऱ्यांची वर्दळ बाजार समितीत असते. बाजार समिती प्रशासनाने लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणावर दक्षता घेतली होती.

तालुक्यात बाधितांचा वाढता आकडा व बाजार समितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांची होणारी गर्दी पहाता हमाल व मापाडी यांनी कांदा मार्केट बंद ठेवण्यासाठी प्रशासनाला निवेदन दिले होते.

Advertisement

२१ जुलैपासुन आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार सलग ५ दिवस कांदा मार्केट लिलाव सुरु ठेवण्याचा निर्णय झाला. कांदा वजनमापाचे कामकाज सकाळी ८.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत चालू राहणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Advertisement

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li