रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते विश्‍वासाचे ! कोरोनावर मात केलेल्या 11 वर्षीय मुलाच्या आईची भावनिक पोष्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : माझी व बहिणीची मुले, बहिण व भाउ मुंबईवरून भाळवणीत आले,दोन दिवसानंतर मुंबईत सासूबाईंची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. मी मुंबईत कॉरंटाईन झाले, गावी आलेल्यांची कोराना चाचणी करण्यात आल्यानंतर माइ-या 11 वर्षाच्या लहानग्यालाही कोराची बाधा झाल्याचा अहवाल आला.

मी मुंबईत कॉरंटाईन, सासू हॉस्पिटलमध्ये व 11 वर्षांचा मुलगा नगरच्या बुथ हॉस्पिटलमध्ये दाखल अशा विचित्र अवस्थेत वर्गमित्र अ‍ॅड. राहुल झावरे यांनी आमदार नीलेश लंके यांच्या मदतीने माइ-या कुटूंबाला  सर्वतोपरी मदत करीत रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते अधिक विश्‍वासाचे असतेे हे कृतीतून सिद्ध केल्याची भावनीक पोष्ट जयश्री पटटेकर या आईने सोशल मिडीयावर शेअर केली आहे.

जावयामुळे भाळवणीमध्ये कोरोना आल्याची चर्चा सुरू झाली आणि माइ-या आईच्या घराजवळ फिरकायला कोणीही मागेना. अशा स्थितीमध्ये वर्गमित्र राहुल झावरे यांच्याशी संपर्क केला  आणि आमच्या सर्व समस्या आपोआप दुर होउ लागल्या.

मी मुंबईत, मुलगा एकटाच बुथ हॉस्पिटलमध्ये होता. अ‍ॅड. झावरे यांनी आमदार नीलेश लंके, तहसिलदार ज्योती देवरे यांच्याशी चर्चा केली. मुलावर योग्य उपचार होतात किंवा नाही यासाठी नगरच्या वैदकिय अधिका-यांशी संपर्क साधला गेला. त्यानंतर मात्र सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह चर्चा मात्र थांबली. खरे तर आईचे दोन्ही जावई मुंबईतच होते.

असे असतानाही जावयाने गावात कोरोना आणल्याच्या, विनापरवाणगी तालुक्यात आल्याच्या अफवा पसरविल्या गेल्या. अ‍ॅड. झावरे यांनी प्रशासनास योग्य माहीती दिल्यानंतर मात्र आमच्या कुटूंबाला मोठा दिलासा मिळाला. 14 दिवस बुथ हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला. त्याला बुथ हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले.

त्यावेळीही अ‍ॅड. झावरे यांनी त्याच वेळी पत्रकार मित्र विजय वाघमारे यांच्यासह घरी जात मुलाची आस्थने चौकशी केली. आमदार लंके यांच्याशी फोनवर संभाषण करून देत मुलास धिर दिला. कॉलेजमधील मित्र मैत्रिणी नंदा, शबाना,सुवर्णा, स्मिता, अभय भिसे, इंद्रजित, गिताराम या मित्रांनीही अतिशय खडतर काळात मोठा मानसिक आधार दिला.

स्मिताने दवाखान्यात स्वतःच्या मुलाप्रमाणे माइ-या मुलाची काळजी घेतल्याचेही जयश्री यांनी आपल्या पोष्टमध्ये नम्रपणे नमुद केले आहे. चौकट भाच्यासाठी काय खाउ देउ मुलगा नगरच्या दवाखान्यात, सासू मुंबईच्या दवाखान्यात, मी घरी कॉरंटाईन अशा संकटाच्या काळात आमदार नीलेश लंके यांनी गावाकडची काही काळजी करू नका.

माइ-या भाच्यासाठी काय खाउ घेउन जाउ असा अशी विचारणा फोन करून केली. मुलास काजू कतली आवडते हे समजल्यानंतर त्यांनी मुलगा घरी परतल्यावर अ‍ॅड.झावरे यांच्यामार्फत त्यास आठवणीने काजू कतली पाठविली.संकट काळात इतकी आपुलकी, मदत आणि पाठींबा मिळविण्यासाठी मित्र परिवार चांगला असवा लागतो असेही पटटेकर यांनी म्हटले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

Leave a Comment