Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingPolitics

नुसतेच पत्रे ठोकण्याऐवजी यंत्रणेत सुधारणा करा – माजी आ. राठोड

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- नगर शहरात लॉकडाऊननंतरही करोना रुग्ण वाढले आहेत. एका अर्थाने मनपा प्रशासन अपयशी झाले आहे, असा आरोप करत शिवसेना उपनेते माजी आ. अनिल राठोड यांनी केलाय.

‘लॉकडाऊन करण्यास विरोध नाही. पण ते नियोजनपूर्ण आणि पद्धतशीर असावे. दुर्दैवाने महापालिका यंत्रणा केवळ पत्रे ठोकतानाच दिसते. उपाययोजना करताना मात्र दिसत नाही.

त्यामुळे घाईघाईत लॉकडाऊन जसे केले जाते तसे मनपाने स्वतःच्या यंत्रणेतदेखील सुधारणा आणावी,’ असेही ते म्हणाले. अहमदनगरमधील सरकारी विश्रामगृह येथे महापौर बाबासाहेब वाकळे

यांच्या उपस्थितीत ‘जनता कर्फ्यू ‘बाबत निर्णय घेण्यासाठी बैठक झाली. त्यावरून नगर शहराचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. माजी आ. राठोड यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन महापालिका यंत्रणेवरच निशाणा साधला.

‘लॉकडाऊनबाबत चर्चा करताना आयोजित केलेल्या बैठकीला सगळ्या प्रकारच्या व्यापाऱ्यांना बोलावणे गरजेचे होते. त्यांचे विचार ऐकून घेणे संयुक्तिक ठरले असते. व्यापारी आणि सर्वपक्षीय नगरसेवक यांना घेऊन बैठक घेतली पाहिजे होती.

कारण लॉकडाऊनमध्ये जनतेचा सहभाग हा महत्त्वाचा आहे. दुसऱ्या शहरांत लॉकडाऊनचा प्रयोग सुरू आहे. मात्र त्यांची नियमावली योग्य ठरली असल्याने ते यशस्वी होत आहेत.

आपल्या येथे लॉकडाऊननंतरदेखील रुग्ण वाढले, म्हणजेच प्रशासन योग्य पद्धतीने नियोजन करीत नाही. प्रशासकीय अपयश झाकण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही.

तर लॉकडाऊन करताना प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा निरखून विचार करणे गरजेचे आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेऊन त्यांना या सर्व गोष्टी लक्षात आणून देणार आहे, असेही ते म्हणाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button