Ahmednagar NewsAhmednagar NorthCorona Virus Marathi News

‘ह्या’ तालुक्यात होतोय कोरोनाचा विस्फोट; एकाच दिवसात निघाले २३ पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा विस्फोट होत असतानाचे चिंताजनक चित्र असताना आता श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

श्रीरामपूर शहरात काल 23 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात 20 जण हे वॉर्ड नं. 2 मध्ये करण्यात आलेल्या रॅपीड टेस्ट तपासणीतील तर एक जण अशोकनगर व दोघांचे अहवाल खासगी प्रयोगशाळेतील आहे.

श्रीरामपूर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 68 वर जावून पोहोचली आहे. खासगी रुग्णालयात उपचार करुन तपासणी करण्यात आलेल्यामध्ये शहरातील प्रतिष्ठीत व व्यापारी असो.

चे माजी पदाधिकारी तर दुसरी महिला ममदापूर येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील आहे. तर रात्री साडेदहा वाजता आलेल्या एकूण 21 अहवालात 20 अहवाल हे वॉर्ड नं. 2 मध्ये करण्यात आलेल्या रॅपीड टेस्टमधील आहेत.

एक जण अशोकनगरचा आहे. वॉर्ड नं. 2 मधील करोनाबाधित मयत व्यक्तीच्या घरातीलच दोन महिला, तीन मुलांचा समावेश आहे तर त्यांच्याच संपर्कातल अन्य काही लोक आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button