कोरोनाचा आता पार्ले जी कंपनीत शिरकाव!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- नाशिकमधील एका नामांकित बिस्किट उत्पादक कंपनीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पार्ले जी कंपनीतील सहा कामगारांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे.

संबंधित कामगार काम करीत असलेला विभाग आता प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात कोरोना व्हायरसनं आता थैमान घातलंय.

मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांसोबतच आता राज्यातील इतर शहर आणि ग्रामीण भागातही कोरोनाचं संकट अधिक गडद झाल्याचं पाहायला मिळत आहे.

या आधी सातपूर औद्योगिक वसाहतमधील नामंकित औषध निर्मित्या कंपनीतील वीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची समोर आलं होतं.

नाशिक पाठोपाठ आता इगतपुरी औद्योगिक वसाहतीत कोरोना शिरकाव झाला आहे. दरम्यान, नाशिकच्या गोंदे येथील एकाच कंपनीत गुरुवारी एकाच वेळी ९३ कर्मचारी कोरोनाबाधित आढळले होते.

सातपूर औद्योगिक वसाहतमधील ‘ग्लेनमार्क’ या नामांकित फार्म कंपनीतील वीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

कोरोनाने आता थेट औद्योगिक वसाहतीत शिरकाव केल्यानं कामगार वर्गात मोठी दहशत पसरली आहे. ‘ग्लेनमार्क’ ही औषध निर्मिती करणारी कंपनी सातपूर औद्योगिक वसाहतीत आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्याने सातपूर औद्योगिक वसाहतीत मोठी खळबळ उडाली आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment