Ahmednagar NewsAhmednagar NorthCorona Virus Marathi News

नेवासा तालुक्यात ‘ह्या’ ठिकाणी आढळला कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. आता नेवासे तालुक्यातील शिरसगाव येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तालुक्याच्या पूर्व भागात खळबळ उडाली आहे.

नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील 51 वर्षाच्या व्यक्तीला तीन दिवसापूर्वी त्रास होऊ लागल्याने तो व्यक्ती नेवासा येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाला होता.

त्या व्यक्तीचे अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाले. यात तो व्यक्ती कोरोना बाधित आढळल्याची माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली आहे

. नेवासा येथील कोविड केअर सेंटर मध्ये या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button