Ahmednagar CityAhmednagar News

महापौरांनी वाभाडे काढल्यानंतर झाली कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी!

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- मनपा आरोग्य विभागाने आरोग्य तपासणी न केल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवस कामकाज बंद ठेवले होते. त्यानंतर आज (दि. १६) महापालिकेचे कर्मचारी कार्यालयात आले.

मात्र या कर्मचाऱ्यांनी दुपारपर्यंत महापालिकेच्या प्रवेशद्वारात पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान, महापौर बाबासाहेब वाकळे यांना हे समजताच त्यांनी महापालिकेत येऊन आरोग्य विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले.

दरम्यान, दुपारी उशिरा कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली. महापालिकेतील एका अधिकाऱ्यासह काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने भयभीत झालेल्या कर्मचाऱ्यांनी गेले तीन दिवस काम बंद ठेवले होते.

बुधवारी (दि. १५) महापौर वाकळे यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार आणि कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांच्यासमवेत बैठक घेऊन कर्मचाऱ्यांनी कामकाज सुरू करावे,

त्यांची आरोग्य तपासणी तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळपासून कर्मचारी कार्यालयात आले. मात्र दुपारपर्यंत वाट पाहूनही आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू झाली नव्हती.

त्यामुळे कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी कर्मचाऱ्यांसमवेत महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.

याची माहिती महापौर वाकळे यांना समजताच त्यांनी महापालिकेत येऊन आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांसमोरच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना चांगलेच खडे बोल सुनावले.

आरोग्य विभाग अशा पद्धतीने बेजबाबदारीने काम करणार असेल तर गंभीर विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच आयुक्तांनाही आरोग्य विभागाचा कारभार सुधारा, असा सल्ला दिला.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close