सायंकाळी सात ते पहाटे पाचपर्यंत व्यक्तींच्या हालचालींवर प्रतिबंध

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-   अहमदनगर महानगरपालिका हद्दीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक आदेशाची मुदत वाढविली आहे.

यापूर्वी दिनांक 17 जुलैपर्यंत असणारे प्रतिबंध आता दिनांक 31 जुलै रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू करण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंध करण्यात आला आहे.

अहमदनगर महानगरपालिका हद्दीत कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर, गल्लोगल्ली याठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे रहाणे, थांबुन राहणे, रेंगाळणे असे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.

याशिवाय,सायंकाळी सात ते पहाटे पाच या वेळेत तातडीच्या वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त व्यक्तींच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.

सदरचा आदेश दिनांक 18 जुलै 2020 रोजी पासून ते 31 जुलै 2020 रोजी पर्यंत लागू राहील. या आदेशानुसार, सायंकाळी 7 ते सकाळी 5 या कालावधीत तातडीच्या वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त व्यक्तींच्या हालचालीस परवानगी असणार नाही.

तथापी कंटेंमेंट झोन वगळता खालील बाबतीत सदरचा आदेश लागु होणार नाही.यात, शासकीय, निमशासकीय कार्यालय, सरकारी महामंडळाचे उपक्रम/ आस्थापना यांचेकडील कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी,

रुग्णालय, दवाखाने,औषधे, फार्मा, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी संबंधीत/आस्थापना, इलेक्ट्रीसिटी, पोट्रोलियम, ऑईल आणि उर्जा संबंधीत व्यक्ती/ आस्थापना, दूरसंचार, इंटरनेट सेवा पुरविणा-या आस्थापना,

प्रसारमाध्यमे प्रतिनिधी (जिल्हा माहिती अधिकारी यांचेकडील वैध औळखपत्र असलेले प्रतिनिधी), अन्न धान्य, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंचे होम डिलेवरी सेवा., पिण्याची पाणी पुरवठा व दुरुस्ती विषयक कामकाज संबंधीत.

मालवाहतुक करणारे ट्रक्स, टेम्पो. आदींचा समावेश आहे. सकाळी 5 ते सायंकाळी 7 या कालावधीत यापूर्वी परवानगी असलेले व्यवहार/ कृती/ किंवा क्रिया यांना परवानगी असेल.

अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींना कंटेंमेंट झोन वगळता जवळच्या/ लगतच्या परिसरामध्ये हालचालीस परवानगी राहील. मात्र, शहराच्या दुसर्‍या भागामध्ये हालचालीस परवानगी असणार नाही.

राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड 19) प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 मार्च 2020 पासुन लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे.

त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात आलेले आहेत.

त्यानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत. कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशिर कारवाईस व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment