दरोड्याच्या तयारीतील दरोडेखोरांची टोळी जेरबंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन , नागरिक एकीकडे त्रस्त असताना गुन्हेगारी प्रवृत्ती देखील डोके वर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

संगमनेर तालुक्यातील कोल्हार – घोटी राज्यमार्गावर असलेल्या चिंचपुर शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

यात पोलिसांनी 10 दरोडेखोर पकडले आहेत. त्यांच्याकडून दोन मालवाहतूक ट्रक, एक मालवाहतूक पीकअप व घातक शस्त्रे असा सुमारे २३ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी: शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलीस पथक गस्त घालत असताना लोणी – संगमनेर रस्त्यावरील चिंचपुर शिवारात असलेल्या वृंदावन हाॅटेल समोर दोन मालवाहतूक ट्रक

(एम. एच. १० ऐडब्ल्यू. ७१,) व (एम. एच. ४० बीएल ५५६९, तसेच एक पिकअप व्हॅन (एम. एच. २५ ऐजे २१४८) या तीन वाहणांनमध्ये संश्ययास्पद हालचाली दिसल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी करण्यासाठी मोर्चा वळवला.

त्यांना पाहून ट्रक मधील ८ ते ९ व पिकअप मधील दोघे अंधारात पळाले. पोलिसांनी पाठलाग करत अरुण उर्फ बिभिषण काळे (वय – ३०, रा. कन्हेरवाडी फाटा,

ता. कळंब, जि. उस्मानाबाद) व समाधान शहाजी घुमरे (रा. आदोरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) या दोघाना पकडले. यावेळी त्यांच्या वाहनातून लोखंडी कटर, धारदार सुरा, लोखंडी कटावण्या, गज अशी घातक हत्यारे ताब्यात घेतली.

पकडलेल्या दोघाकडे पळून गेलेल्याची माहिती विचारल्यानतंर त्यानी नाना भास्कंर ऊर्फ भाषा काळे, राहुल कालिदास काळे, बाबुशा भिमराज काळे, बिभिषण राजाराम काळे, रमेश लगमन काळे, सुभाष ऊर्फ हरी ऊर्फ दादा भास्कंर काळे,

चदंर ऊर्फ चदंऱ्या भास्कर काळे, सुधाकर श्रावण भगत, नवनाथ बाळू काळे व बाबू अनिल शिदें सर्व कळंब तालुक्यातील (जि. उस्मानाबाद) हे रहिवासी पळाल्याचे सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी त्यांचा तपास करत त्यांना ताब्यात घेतले. अद्याप 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment