पावसाळ्यामुळे इतर साथीचे आजार पसरत असताना कोरोनामुळे नागरिकांच्या मनात भिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर(प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी नागरिकांच्या आरोग्य तपासणीने साजरी करण्यात आली.

नागरदेवळे येथे फिजीकल डिस्टन्स व इतर नियमांचे पालन करुन मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरास नागरिकांचा प्रतिसाद लाभला.

फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे म्हणाले की, संत सावता महाराजांनी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कार्य करुन, खरा भक्ती मार्ग दाखवला.

अंधश्रध्देवर प्रहार करुन, त्यांनी कर्तव्य व कर्माचे महत्त्व सांगितले. कोरोनाला हरविणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, संत सावता महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन प्रत्येक नागरिकांनी कोरोनाशी लढा देण्याची गरज आहे.

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता सर्वच नागरिक धास्तावले आहेत. पावसाळ्यामुळे इतर साथीचे आजार पसरत असताना नागरिकांच्या मनात वेगळी भिती निर्माण झाली आहे.

ही भिती दूर करण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीन आरोग्य शिबीर घेऊन कोरोना संदर्भात जनजागृती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या शिबीरात नागरिकांची मधुमेह, रक्तदाब व कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्राथमिक तपासणी करण्यात आली. तर नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करुन कोरोना संबंधी माहिती देऊन या विषाणूपासून बचाव करण्याची जनजागृती करण्यात आली.

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विठ्ठल राहिंज, गौरव बोरुडे, मोहन कुर्‍हे, बालाजी चौधरी, शिवा खरपुडे, सौरभ बोरुडे आदिंसह फिनिक्सच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment