नेवासे तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने जोरदार शिरकाव,अँटिजन टेस्ट करताच …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-नेवासे तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने जोरदार शिरकाव केल्यामुळे दोनच दिवसांत ५० पेक्षा जास्त कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले. मागील आठवड्यामध्ये नेवासे तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी करून प्रादुर्भाव दिसून आला.

सोनईत तर रॅपिड अँटिजन टेस्ट झाल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा मोठा झाला आहे. सोनईमध्ये एकूण ३९ रुग्ण आढळले. त्याबरोबर परिसरातील वंजारवाडी व शिंगणापूर येथील दोन जणांचा ही समावेश आहे.

या पाठोपाठ सलाबतपूर येथेही मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत रॅपिड टेस्ट ताबडतोब रुग्ण सापडत असल्याने उपचार करणे सोपे होत आहे.

सोमवारी तालुक्यातील सलाबतपूर, जळके, गिडेगाव येथील ६० व्यक्तीच्या रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये सोळा व्यक्ती पॉझिटिव्ह निघाले आहे. उर्वरित ४४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे तहसीलदार रुपेश सुराणा यांनी सांगितले.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment