Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

अखेर ‘त्या’ स्त्री-पुरुषांवर गुन्हे दाखल !

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढीस लागण्याचा वेग वाढला आहे. आता सोनईमध्येदेखील रुग्ण वाढू लागले आहेत. ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर अनेक अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

या पार्श्वभूमीवर सोनई प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. असे असताना सोमवारी पहाटे 6 वाजेच्या दरम्यान सोनई-राहुरी रस्त्यावर मास्क न वापरता मॉर्निंगवॉक करण्यासाठी काही स्त्री पुरुष बाहेर पडले होते.

अशा 34 महिला व पुरुषांवर सोनई पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270,

साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 चे कलम 2 व 3 नुसार सोनईतील रहिवाशी असलेले व मास्क न घालता प्रशासनाचे आदेशाचे उल्लंघन करण्याच्या आरोपावरून लहु सोपान आदमाने,

अनिल अण्णासाहेब वाघमारे, सोमनाथ भाऊसाहेब औटी, मकरंद अनंतराव जोगदे, मंगल मकरंद जोगदे, शरद जिजाबा गडाख, जयश्री शरद गडाख, बापू ज्ञानदेव कुसळकर, गोरख नामदेव कुसळकर, दिलीप रामचंद्र शिंदे,

प्रवीण चंद्रकांत एडके, ज्योती प्रवीण बडे, योगेश बहिरू टिमकारे, कुमार केशव माळवे, समीर दादासाहेब दरंदले, दत्तू किसन शिंदे, रमेश म्हसू कुसळकर,

नवनाथ काशिनाथ कुसळकर, दत्तू काशिनाथ कुसळकर,अभय बबन भळगट, रणजीत बाबुराव झाडगे, अशोक दगडू उदमले, गणेश गोपीनाथ लकडे, सुधीर अशोक कानवडे,सुरेश जयराम भोगे , नामदेव गंगाधर बारहाते,

संदीप मच्छिंद्र आढाव, सुनील दिनकर दरंदले, सोमनाथ माधव शिंदे, लक्ष्मण भाऊसाहेब परदेशी, कैलास छबू वैरागर, राजेंद्र बापू डोळसे,

व्यंकटेश रामस्वामी पालेपवार, सतीश रामू शिंदे, या सर्वांविरोधात गुन्हे रजिस्टर नंबर 235, 236, 237, 238, 239, 240, 241, 242, 243 गुन्हे दाखल झाले आहेत.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close