अहमदनगर ब्रेकिंग : दिवसभरात १६५ नवे रुग्ण,आणखी चौघांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने आणखी चार जणांचा बळी घेतला. जिल्ह्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ४४ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात १६५ नवे रुग्ण आढळून आले असून बाधितांची एकूण संख्या २ हजार १९२ झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ दिवसांपासून रुग्णवाढीबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यापूर्वी केवळ १५ जणांचे बळी तीन महिन्यांत कोरोनाने घेतले होते.

मागील तीन आठवड्यात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सर्वाधिक ३४१ रुग्ण आढळून आले. मार्च, एप्रिल व मे महिन्याच्या तुलनेत तीन पट जास्त रुग्ण सोमवारी एका दिवसात आढळले.

मंगळवारी जिल्ह्यात १६५ रुग्ण आढळले. जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४१ बाधित आढळून आले. खासगी प्रयोगशाळेत आणि पोर्टलवर नोंद झालेल्या ८३ रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली.

याशिवाय अँटीजेन चाचण्यांत ४१ रुग्ण आढळले. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ९१५ इतकी झाली असून, एकूण रुग्ण संख्या २ हजार १९२ इतकी झाली आहे.

मंगळवारी रहाता ३ (साकुरी), पारनेर ४ (ढवळपुरी २, सारोळा आडवाई १, किन्ही १), श्रीगोंदे १३ (घोगरगाव ४, काष्टी १, चिकलठाणवाडी १, चांडगाव १, कोळगाव १, देवदैठण ३, घारगाव २), पाथर्डी १ (सोनोशी),

शेवगाव २ (मंगरूळ १, शेवगाव शहर १), श्रीरामपूर २, नगर ग्रामीण ३, नगर शहर १३ रुग्ण आढळले. याशिवाय जलद गतीने कोरोना निदान करण्यासाठी आता अँटीजेन चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये ४१ बाधित आढळले.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment