अहमदनगर ब्रेकिंग : वर्धा जिल्ह्यातील मनोरुग्ण तरुणीवर कल्याण रोडवर वाहनामध्ये अत्याचार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- एका मनोरुग्ण तरुणीवर अहमदनगर शहरातील कल्याण रोडवर अत्याचार झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार करणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभय बाबुराव कडू (रा. सिंहगड रोड, पुणे) असे या व्यक्तीचे नाव आहे. नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या डॉ. सुचिता धामणे यांनी फिर्याद दिली आहे.

अत्याचार झालेली युवती मुळची वर्धा जिल्ह्यातील असून ती मनोरुग्ण असल्याने वर्धा येथून निघून आली होती. तिचा संपर्क अभय कडू याच्याशी आला. कडू याने त्याच्या वाहनामध्ये बसून युवतीला पुणे येथे नेले.

यानंतर तो तिला घेऊन पुणे येथून नगरमध्ये सोमवारी पहाटे दाखल झाला. कल्याण रोडवरील रेल्वे ब्रीजजवळ कडू याने युवतीवर त्याच्या वाहनामध्ये अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे या युवतीला तेथेच सोडून तो निघून गेला होता.

ही युवती सोमवारी नगर शहरामध्ये नग्न अवस्थेत फिरत असताना काही लोकांच्या निदर्शनास आली. याबाबतची माहिती शिंगवे येथील माऊली प्रतिष्ठानला देण्यात आली. एका रुग्णवाहिकेतून या युवतीला माउली प्रतिष्ठानमध्ये दाखल केले. तिच्यावर त्याठिकाणी उपचार सुरू आहे.

याची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरूण मुलाणी, सहाय्यक निरीक्षक किरण सुरसे यांना मिळाली. त्यांनी शिंगवे येथे जाऊन युवतीची विचारणा केली. तिचा जबाब नोंदविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती शुद्धीवर नसल्याने पोलिसांचे पथक माघारी परतले.

माऊली प्रतिष्ठानचे डॉ. धामणे यांच्याकडून या युवतीवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना तिने मंगळवारी सर्व घटनाक्रम डॉ. धामणे यांना सांगितला. यानंतर डॉ. धामणे यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली त्यानंतर आरोपीस अटक केली.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment