‘इतक्या’ रुपयांत भारतात भेटू शकते कोरोनाची लस जाणून घ्या सविस्तर माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना प्रतिबंधक लस शेकडो लोकांमध्ये विषाणूविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण करण्यात यशस्वी झाल्याची महत्त्वपूर्ण घोषणा वैज्ञानिकांनी केली आहे,या लसीच्या प्राथमिक चाचणीचा रिपोर्टही सकारात्मक आला आहे,ही लस माणसासाठी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना लस विकसित करण्यासाठी मानवी चाचण्या सुरू होत्या. या चाचण्या १,०७७ कोरोना रुग्णांवर घेण्यात आल्या असून या लसीने रुग्णांमध्ये पांढर्या पेशी व अँटिबॉडी विकसित झाल्या होत्या ,ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीच्या द्वारे बनविण्यात आलेल्या या लसीच्या उत्पादनामध्ये भारताची भूमिका महत्वाची ठरणार आहे,सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ही भारतीय कंपनी जगातील औषधे बनविणारी एक प्रमुख कंपनी आहे या कंपनीचे सीईओ अदार पूनावाला म्हणाले की एका आठवड्यात क्लिनिकल ट्रायल सुरु करण्याबाबत आवेदन करणार आहे.

ऑक्सफर्डने बनवलेल्या लसीमुळे जगभरात लाखो नागरीकांचे बळी घेणाऱ्या कोरोना व्हायरसला रोखता येणे शक्य असल्याचे दिसत आहे. ऑक्सफर्डची लस पूर्णपणे मानवी शरीरासाठी पूर्णपणे सुरक्षित असून ती रोगप्रतिकारक शक्तीलाही चालना देत असल्याचे  म्हटले जात आहे.

दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठाने करोना प्रतिबंधासाठी जी लस विकसित केली आहे, त्याचे उत्पादन पुढील दोन ते तीन आठवडय़ात आम्ही सुरू करू , मानवी वैद्यकीय चाचण्या यशस्वी झाल्या तर ही लस सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये बाजारात उपलब्ध होईल, असे पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थेने म्हटले आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले की, त्यांच्या कंपनीकडून तयार करण्यात येणाऱ्या  50 टक्के लस भारतातच पुरवल्या जातील, आणि उर्वरित इतर देशांना. पूनावाला म्हणाले की ही लस बहुधा सरकार खरेदी केली जाईल आणि लसीकरण कार्यक्रमांच्या माध्यमातून देशातील नागरिकांना मोफत मिळतील.

ही लस किती रुपयांना उपलब्ध असेल यासंदर्भात पूनावाला यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सध्या संपूर्ण जग करोनाचा सामना करत असल्याने लसीची किंमत कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न असेल असं म्हटलं आहे. आज कोविड चाचणीचे सरासरी दर 2500 रुपये आहे.मात्र या लसीची किंमत एक हजार रुपये ठेवण्याचा विचार करीत आहोत. किंवा त्यापेक्षा कमी असेल,

पुढे बोलतना पूनावाला म्हणाले वाटत नाही की त्यासाठी कोणत्याही व्यक्तीला पैसे द्यावे लागतील कारण लस बहुधा सरकार खरेदी करतील आणि नंतर लसीकरण कार्यक्रमांच्या माध्यमातून मोफत वाटल्या जातील,भारत सरकारने पोलिओ, मलेरियासारख्या धोकादायक आजारांविरोधात कठोर पावले उचलत देशभरामध्ये लसीकरण मोहीम राबवली होती. याच कारणामुळे भारतामध्ये आता या आजारांनी ग्रासलेले अगदीच मोजके रुग्ण आढळून येतात.

दरम्यान या लसीच्या आतापर्यंतच्या चाचण्यांवरुन ही लस करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये खूपच प्रभावशाली ठरेल असं चित्र दिसत आहे. ऑक्सफर्ड व्हॅकसीन ग्रुपचे निर्देशक अ‍ॅण्ड्रू जे पोलार्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार अ‍ॅण्टीबॉडी रिसपॉन्सवरुन ही लस प्रभावशाली असल्याचे दिसून आलं आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment